Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभेची चूक विधानसभेला टाळण्यासाठी भाजपचा प्लॅन तयार; केंद्रीय नेतृत्व सक्रिय

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये भाजपचे महाअधिवेशन पार पडले. यामध्ये लोकसभेचे चिंतन आणि आगामी विधानसभेची रणनीती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळीही महायुतीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेत विधानसभेवर चर्चा केल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
अमित शहा विधानसभेचा आढावा घेत असले तरी विधानसभेची खास जबाबदारी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांच्यावर असणार आहे. ते आठवड्यातील दोन दिवस महाराष्ट्रात असणार आहेत. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठका घेत त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. भाजपचे ९ खासदार विजयी झाले. मात्र, महायुतीला फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेतील सुमार कामगिरीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व सक्रिय झाले आहे. महाराष्ट्राची प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांना देण्यात आली.
भुपेंद्र यादव यांच्यासोबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते गृहमंत्री अमित शहा यांच्या खास मर्जीतले मानले जातात. यांच्या मार्फत अमित शाह हे महाराष्ट्राच्या निवडणुकीवर लक्ष ठेऊन असणार आहेत.
महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव हे आठवड्यातून दोन दिवस महाराष्ट्रात थांबणार आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तसेच त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्यासाठी बाहेरील राज्यातील भाजप नेते कार्यकर्त्यांची फौज महाराष्ट्रात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघातील आढावा गुजरातमधील भाजप नेते घेत आहेत. तर, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांचा आढावा छत्तीसगडमधील नेत्यांकडून घेण्यात येतो आहे. हे नेते आपला अहवाल वरिष्ठांना देणार आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा