Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत भाजपाचा 150 पेक्षा अधिक जागांवर लढण्याचा निर्धार ; बैठकीत मोठा निर्णय

Devendra Fadnavis

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या भेटीगाठी-बैठका सुरु झाल्या आहेत. निवडणुकीसाठी इच्छुक असलेले नेते उमेदवारी ज्या पक्षातून मिळेल अशा पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. (BJP Core Committee Meeting)

पक्षांनी रणनीती आखत मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. महायुतीत (Mahayuti) आणि मविआ मध्ये (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. मात्र यांमध्ये कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत चर्चा सुरु असतानाच आता भाजपने १५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी मत व्यक्त केले आहे.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये जागा वाटप आणि विधानसभेची रणनीती यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे मत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते त्याचप्रमाणे सर्वेक्षण अहवाल याच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत.

मागील निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या ती जागा त्याच पक्षाकडे राहील.
मात्र काही मोजक्या जागा आहेत त्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे,
याबाबत लोकसभा निकाल आणि सर्वेक्षण अहवाल याचा आधार घेतला जाणार आहे.

आगामी विधानसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

You may have missed