Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसला मोठा धक्का! दोन आमदार करणार शिंदे गटात प्रवेश?; राजकीय समीकरणे बदलणार

Congress-Eknath Shinde

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान नेते, पदाधिकारी आणि आमदार यांच्या पक्षांतराला वेग आल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गट (Shivsena Eknath Shinde) काँग्रेसला (Congress) धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली. त्यामुळे हे दोन्ही आमदार शिंदे गटात प्रवेश करतील असे बोलले जात आहे.

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंगळवारी (दि.१३) रात्री उशिरा या दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. लवकरच ते काँग्रेसला रामराम ठोकून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत.

हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर हे विधानपरिषदेतील काँग्रेसचे आमदार आहे. हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत. तर जितेश अंतापूरकर हे नांदेडच्या देगलूरचे आमदार आहेत. विधानपरिषद निवडणुकीमध्ये या दोन्ही आमदारांनी क्रॉस वोटिंग केले होते. (Maharashtra Assembly Election 2024)

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून या दोन्ही आमदारांवर कारवाई होणार आहे.
या कारवाई पूर्वीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकरांनी शिंदे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed