Maharashtra Assembly Election 2024 | मविआचा समान जागावाटपाचा फॉर्म्युला पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांची रणनीती?

Mahavikas Aghadi

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. मागील काही दिवसांपासून जागावाटपावरून महाविकास आघाडीत एकमत होत नव्हतं (MVA Seat Sharing Formula). दरम्यान आता काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (Sharad Pawar NCP) प्रत्येकी ८५ जागांवर निवडणूक लढण्यास सहमत झाले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

यामध्ये काँग्रेस १०० हुन अधिक जागा लढवण्यासाठी आग्रही होते तर शिवसेना ठाकरे गटानेही अधिक जागांसाठी भूमिका घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण झाला होता. दरम्यान शरद पवार यांनी सुवर्णमध्य साधत समान जागावाटपाचा फॉर्म्युला पुढे करत आपले राजकीय चातुर्य पुन्हा एकदा दाखवले आहे.

त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या या नव्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची मांडणी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या जागावाटपात, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी पारंपरिक वर्चस्व नसलेल्या जागा सोडल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात शरद पवारांना अधिक जागा मिळाल्या आहेत.

शरद पवारांची ही रणनीती केवळ जागावाटपापुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या सत्ताकारणात प्रभाव वाढवण्याची असल्याची कुजबुज आहे. विधानसभेत महाविकास आघाडीने विजय मिळवला तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदावर दावेदारी मजबूत होईल, असंही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed