Maharashtra Assembly Election 2024 | ‘पारनेर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवणार’; ठाकरे गटाच्या नेत्याचे वक्तव्य; राणी लंकेंचा पत्ता कट होणार?

uddhav thackeray Sharad Pawar

पारनेर: Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचे जागावाटप (MVA Seat Sharing Formula) अंतिम टप्प्यात आले आहे. निवडक काही जागांवर तिढा आहे. हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षाकडून केला जात आहे. एकाच मतदारसंघात मित्रपक्षांचे अन्य उमेदवार इच्छुक असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. (Parner Assembly Constituency)

पारनेर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) इच्छुकांकडून जोरदार फिल्डींग लावण्याचे काम सुरू आहे. सध्या पारनेर मतदारसंघ विद्यमान खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके (Rani Lanke) या इच्छुक आहेत. तर ठाकरे गटाकडून तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Dr Shrikant Pathare) हे इच्छुक आहेत.

पारनेर- नगरच्या जागेवर शिवसेनेने दावा सांगितला असून यासंदर्भात डॉ.श्रीकांत पठारे यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले होते. या बैठकीला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, अहिल्यानगरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, पारनेर तालुक्यातील गटप्रमुख संतोष येवले, संतोष साबळे उपस्थित होते.

डॉ. श्रीकांत पठारे, ” लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके विजयी झाले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या शब्दानुसार पारनेर-नगर मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह शिवसेनेने धरला आहे.

तसेच खासदार निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील आहेत व तेही जूने शिवसैनिक आहेत, त्यामुळे खासदार राष्ट्रवादीचे असल्याने विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा आग्रह सर्व शिवसैनिकांचा आहे.

शिवसेना ही निवडणुक मोठ्या ताकदीने लढणार असून कोणत्याही परिस्थितीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवणार “, असे पठारे यांनी म्हंटले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed