Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीला रोखण्यासाठी मविआच्या जागावाटपाची ब्लू प्रिंट तयार?; जागावाटपाची रणनीती ठरली
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. जागावाटपावरून बैठका सुरु आहेत. दरम्यान आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाची (MVA Seat Sharing Formula) ब्लू प्रिंट तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विभागानुसार आणि पक्षांच्या ताकदीनुसार महाविकास आघाडीचे जागावाटप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Mahayuti Vs Mahvikas Aghadi)
https://www.instagram.com/p/DAczJOtJDbk
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागा वाटप प्रामुख्याने विभागनिहाय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याची ब्लूप्रिंटही ठरल्याची माहिती आहे. महायुतीला सत्तेतून खाली खेचण्यााठी आणि राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी या फॉर्म्युलाला सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. या ब्लू प्रिंटनुसार, विभागनिहाय जागा वाटपावर भर देण्यात येणार आहे.
https://www.instagram.com/p/DAc4RxEpR04
म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील जागा वाटपात काँग्रेसला प्रथम स्थान, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) यांच्या पक्षाला तर मुंबईसह कोकणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (Shivsena Thackeray Group) जास्त जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात एकूण ४६ आणि विदर्भात ६२ जागा आहेत, तर पश्चिम महाराष्ट्रात ५८ आणि उत्तर महाराष्ट्रात ४७ जागा आहेत. (Congress)
https://www.instagram.com/p/DAcxXzNJqtS
मुंबईसह कोकण पट्टयात एकूण ७५ जागा आहेत. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ते पाहायला मिळाले होते. पक्षफुटीनंतर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या पाठीमागे मोठा जनाधार आहे.
https://www.instagram.com/p/DAc1CHCJKCq
दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात काँग्रेसने बाजी मारली आहे. लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्यात काँग्रेसने मुसंडी मारली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने ६२ पैकी ४३ विधानसभा जागांवर आघाडी मिळवली होती. तर मुंबईसह कोकणात ठाकरेंचा वरचष्मा राहिला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
https://www.instagram.com/p/DAbMBpopUbs
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)