Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात टोकाचा संघर्ष

Uddhav-Thackeray-Rahul-Gandhi

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत २३० ते २४० जागांवर एकमत झालेले आहे (MVA Seat Sharing Formula). मात्र इतर जागांवर तिढा कायम आहे. विदर्भातील जागांवरून काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) मतभेद असल्याची माहिती मिळत आहे. येथील जागांवर एकमत होत नसल्याने ही यादी दिल्ली हायकमांडकडे पाठवण्यात आली आहे.

काँग्रेस हाय कमांडशी ठाकरे गटाचे नेते चर्चा करणार आहेत. प्रचारासाठी वेळ कमी असल्याने जागेचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

२० ते २५ जागांवर तिढा कायम असताना यामध्ये विदर्भातील जागांवर सर्वाधिक तिढा आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये अधिक जागांवर तिढा असल्याची माहिती आहे. लोकसभेला अमरावती आणि रामटेक हे दोन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याने विधानसभेला विदर्भात चार ते पाच अधिक जागा काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाला सोडाव्यात, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

त्यामुळे विदर्भातील अशा काही जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही आग्रही आहेत. आणि या जागांवर निर्णय घेणे राज्यातील काँग्रेस नेत्यांना काहीसे कठीण झाल्याने अशा जागांची यादी हायकमांडकडे काँग्रेसने पाठवली आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed