Maharashtra Assembly Election 2024 | मविआतील जागावाटप आणि एकत्र निवडणूक लढण्याबाबत काँग्रेसची मोठी घोषणा
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीला घेऊन काँग्रेसने तयारी सुरु केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) काँग्रेसला (Congress) मोठे यश मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेला आहे. ‘ महाराष्ट्रात जनतेला परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र निवडणुका लढणार असून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू’ ,असा तिन्ही पक्षांनी निर्धार केला असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के.सी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, ” राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोट निवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. पण तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपाचा अयोध्येनंतर बद्रिनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे असे चित्र राज्यात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल व
महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांच्या प्रमुख उपस्थितीत व
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब
येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली.
या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat),
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde),
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आदी उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात
Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक