Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांकडून पत्ते उघड? म्हणाले, “विधानसभा निवडणुकीनंतर …”

uddhav thackeray Sharad Pawar

कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून सभा, बैठका सुरु झालेल्या आहेत. जागावाटपावरून राजकारण रंगताना दिसत आहे. नाराज नेते पक्षांतर करण्याच्या वाटेवर आहेत. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. (MVA CM Candidate)

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसेच, महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून (Shivsena UBT) वारंवार मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा केली जावी, अशी मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) अनेक वेळा भाष्य केले आहे.

तर काँग्रेसकडूनही (Maharashtra Congress) नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील (Jayant Patil) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, आता कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्याबाबत भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, ” मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा कोण होणार हे ठरणार आहे. मुख्यमंत्री कोण? हे आता महत्त्वाच नाही.

सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे.
तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे “,
असे म्हणत संख्याबळ आल्यानंतर नेतृत्व कुणी करायचे, याचा निर्णय होईल असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवारांनी पुढे बोलताना १९७७ चे उदाहरणही दिले. ते म्हणाले, ” आणीबाणीनंतर देशात निवडणूका झाल्या.
या निवडणुकीत जयप्रकाश नारायण यांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
तेव्हा सर्व एकत्र आले, त्यावेळी कोणताही चेहरा निवडणुकीत नव्हता.

निवडणुकीनंतर मुरारजी देसाई यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आले.
तोपर्यंत त्यांचे नाव कुठंही आले नव्हते. तो निर्णय निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर जाहीर करण्यात आला होता”,
असे शरद पवार यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक

Pune Crime News | सुधीर गवस खुनाचा बदला घेण्यासाठी खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेला गुंड जेरबंद (Video)

You may have missed