Maharashtra Assembly Election 2024 | आंबेगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच; नाईलाजास्तव लढण्यापेक्षा जागा शिंदे गटाला देण्याची मागणी; वळसे-पाटील जागा सोडणार?
आंबेगाव: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीत जागावाटपावरून (Mahayuti Seat Sharing) रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाबाबत (Ambegaon Assembly Constituency) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भूमिका जाहीर केल्यावर आता शिवसेना शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) या जागेवर दावा केला आहे.
राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) आंबेगावमध्ये आली असता वळसे पाटलांनी मोठे वक्तव्य केले होते. माझी कन्या विधानसभेची निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल, असे वळसे पाटील यांनी म्हंटले होते. त्यानंतर, आता शिंदे गटाच्या सचिन बांगर (Sachin Bangar) यांनी ही जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटलांनी नाईलाजास्तव निवडणूक लढू नये, त्यापेक्षा आंबेगाव विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी. वळसे पाटलांनी मोठं मन दाखवण्याची इच्छा शिंदे गटाने व्यक्त केली आहे. यानिमित्ताने आंबेगावमध्ये भगवा फडकविण्याचं दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न ही पूर्ण होईल, असेही बांगर यांनी म्हटले.
यावरून आता आंबेगावच्या जागेवरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. आधीच महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा येत असताना, आता आंबेगाव मतदारसंघावरुन महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल आंबेगावमध्ये घेतलेल्या महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार घातल्यानंतर आज ही नवी खेळी शिंदे गटाने खेळली आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य