Maharashtra Assembly Election 2024 | एकाच मतदारसंघावर महायुतीतील दोन पक्षांचा दावा; शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली

कर्जत: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपावरून महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या (Karjat Khalapur Assembly Constituency) जागेवरून महायुतीत रस्सीखेंच सुरू आहे. शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar NCP) या दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. कर्जतच्या जागेवरून राष्ट्रवादी शिवसेना आमने-सामने आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुनिल तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते २८८ ही जागा मागतील, असा टोला आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांना लगावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघावर दावा केला होता. त्यावरून आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.
महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता ही जागा पक्षश्रेष्ठी कोणत्या पक्षाला सोडतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा