Maharashtra Assembly Election 2024 | पुणे शहरातील मविआ उमेदवारांच्या प्रचारार्थ मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांच्या उपस्थितीत भव्य सभा; पवार म्हणाले – “… तर महायुतीला सत्तेतून खाली खेचावे लागेल”

Mallikarjun Kharge-Sharad Pawar

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील (Pune Cantonment Assembly) महाविकास आघाडीचे (MVA Candidate) उमेदवार रमेश बागवे (Ramesh Bagwe), कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील (Kasba Peth Assembly) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील (Shivaji Nagar Assembly) उमेदवार दत्ता बहिरट (Datta Bahirat), पर्वती मतदारसंघातील (Parvati Assembly) उमेदवार अश्विनी कदम (Ashwini Kadam) यांच्या प्रचारार्थ वानवडी येथील संविधान चौकात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या उपस्थितीत सभा पार पडली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ज्येष्ठ नेते उल्हास पवार (Ulhas Pawar), काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे (Sanjay More) यावेळी उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ” मोदींनी महाराष्ट्राच्या विकासावर बोलावे. गांधी परिवाराने आपले प्राण गमावले त्या देशाचा मोदी-शहा या जोडीने सत्यनाश केला आहे. काँग्रेसने विकसित केलेले सगळे हे विकायला निघाले आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले आहेत.

दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याची घोषणा करणारे गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. महागाई वाढली आहे. सीमेवर घुसखोरी सुरू आहे. राम मंदिर आणि संसद भवन गळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. खोके सरकार केवळ खिसे भरण्यात व्यस्त आहेत”, अशी टीका खरगे यांनी केली.

शरद पवार म्हणाले, ” लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या नेत्यांनी चारसो पारची घोषणा दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य घटना बदलण्याचा त्यांचा डाव लपून राहिला नव्हता. मतदारांनी त्या निवडणुकीत भाजपला धडा शिकवला. मात्र, राज्य घटनेसमोरील धोका टळलेला नाही.

भाजपने राज्यात दोन पक्ष फोडले. महायुतीचे सरकार लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहे. पण, या राज्यात मुली, महिला असुरक्षित आहेत, राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हे राज्य वाचवायचे असेल तर महायुतीला सत्तेतून खाली खेचावे लागेल”, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed