Maharashtra Assembly Election 2024 | इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीला; पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात पडद्यामागे घडामोडी; यंदाची विधानसभा रंगतदार होणार

sharad-pawar

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळालं. मात्र, महायुतीला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही. महाविकास आघाडीला ३० जागा तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. आता महाराष्ट्रात लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी राज्यात दौरे सुरू करत आढावा घेण्यास सुरूवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच शरद पवारांच्या दौऱ्याने अनेकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केला आहे.

पवारांना निवडणुकीसाठी तगडे उमेदवार मिळालेले आहेत. अशातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे.

इंदापूरचे (Indapur) माजी आमदार हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. कालच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज साताऱ्यातील माण-खटावचे सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीतही त्यांनी माण-खटावमधून विधानसभेची उमेदवारी मिळावी, याबाबत चर्चा झाल्याचे स्वत: अनिल देसाईंनी सांगितले. गेल्या १५ वर्षांपासून मी थांबलो आहे. पण मला माणच्या उर्मट आमदारांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे मला उमेदवारी पाहिजे, असे अनिल देसाईंनी म्हटले.

याशिवाय, काल पंढरपूरचे माजी सभापती वसंत देशमुख, भगीरथ भालके, नगराध्यक्ष नागेश भोसले, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे अनिल सावंत (Anil Sawant), काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांच्यासह अनेक आजी-माजी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे एकेकाळी शरद पवार यांचे कट्टर समर्थक औदुंबर अण्णा पाटील यांचे
नातू अमरजीत पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे.
त्याचबरोबर फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी, य़ा मागणीसाठी फलटणमधील बौद्ध समाजाचे अनेक पदाधिकाऱ्यानीही शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, माण- खटाव तालुक्यातील भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात
शरद पवार गटाकडून प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
पण याच ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून शेखर गोरे हेदेखील इच्छुक
असल्याचे सांगितले जात आहे. पण अनिल देसाई यांनीही या मतदार संघावर दावा केला आहे.
यामध्ये शरद पवार आता कोणाकोणाला उमेदवारी देणार हे येणारा काळच सांगणार आहे.

त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून रस्सीखेच असल्याने
अनेक मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed