Maharashtra Assembly Election 2024 | ‘जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचीच निवड करा’, अमित शहांच्या सूचना; म्हणाले – “राज्यातील शासनाच्या योजना…”

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) गोटात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री (दि.८) रविवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी अमित शहा (Amit Shah) यांचा ताफा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाला. यावेळी शहा यांची महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील सह्याद्री अतिथीगृहात दाखल झाल्याची माहिती आहे. या बैठकीत राज्यातील निवडणुकींवर चर्चा झाली. यावेळी अमित शहा यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना मूलमंत्र दिला.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फोकस करावं असंही शहा यांनी सांगितलं. स्थानिक विकास मुद्दे, राज्यातील शासनाच्या योजना यावर प्रचार प्रसार फोकस असावा, असे अमित शहा यांनी यावेळी सांगितले. तसेच भाजप नेत्यांना सार्वजनिक वाद टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या. आपण महाआघाडीत आहे तर संयम बाळगून ऐक्याची प्रतिमा जनतेसमोर येईल याची काळजी घेतली पाहिजे, असे अमित शहा यांनी म्हंटले.
जिंकण्याची क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करावी. विरोधकांच्या खोट्या वक्तव्यांना उत्तर देत रहा.
भाजपच्या काही आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, अशा स्थितीत जागांबाबत योग्य निर्णय घ्या,
असे त्यांचे म्हणणे आहे. भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीत अमित शहांनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाकडेही लक्ष वेधले.
यासोबतच अमित शहा यांनी भाजप नेत्यांना राज्य सरकारने घेतलेले निर्णय आणि योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना केल्या.
यासह, गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान, शहा यांनी ‘लालबागच्या राजा’ (Lalbaugcha Raja) समोर डोके टेकवले.
यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले.
‘लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शहा यांच्या कुटुंब दरवर्षी मुंबईत येते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा