Maharashtra Assembly Election 2024 | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं; नेमकी काय चर्चा झाली? प्रसाद लाड म्हणाले…

Meeting Of Mahayuti Leaders

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक घेतली. राज ठाकरेही (Raj Thackeray) महाराष्ट्र दौऱ्यावर असून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून शिवसन्मान (Shiv Sanman Yatra) आणि जनसन्मान (Jan Sanman Yatra) अशा यात्रा काढणार असल्याची घोषणा झाली आहे. तर भाजपकडून (BJP Pune Meeting) पुण्यात महाअधिवेशन घेऊन मोर्चेबांधणीस सुरुवात झाली. काँग्रेस पुन्हा नव्या ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास तयार आहे.

दरम्यान गुरुवारी मध्यरात्री वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली (Meetaing Of Mahayuti Leaders) . या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) तसेच महायुतीचे इतर नेतेही उपस्थित होते. याबाबत आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत या बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली.

प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले,”विधानसभेच्या रणनीती संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत ७ विभागात २८८ विधानसभेतील विभागनिहाय चर्चा झाली.

त्यानुसार राज्यात महायुतीचा समन्वय दौरा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागात मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसेच संवाद दौरा देखील आयोजित करण्यात आला आहे. राज्यात अशा एकूण सात सभा होतील. याशिवाय आठवी समाप्तीची सभा मुंबईत पार पडेल”, असं प्रसाद लाड यांनी सांगतलं.

ते पुढे म्हणाले, ” येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात येईल.
महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि जाहीर सभा येत्या २० ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होईल.
यावेळी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यंत्री उपस्थित राहतील. महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर जाहीर सभा पार पडेल.

महायुतीच्या नेत्यांचे हे दौरे साधारण सात ते दहा दिवसांचे असतील.
प्रत्येक दिवशी दोन किंवा तीन विधानसभा कव्हर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
यावेळी महायुतीचे इतर नेतेही मेळावे घेतील. या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल”,
असेही प्रसाद लाड यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed