Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा; म्हणाले – ‘निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव’

CM Eknath Shinde

छत्रपती संभाजीनगर: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Group) नेत्याने खळबळजनक विधान केले आहे. निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव (Riots During Elections) असल्याचा मोठा दावा आमदार संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी केला आहे.

संजय शिरसाट म्हणाले, ” नाशिक, संभाजीनगर येथे झालेल्या दोन दंगलींचा आढावा घेतला तरी कळेल की या दंगली सुनियोजित होत्या. विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार केला जाणार आहे अशी माहिती आहे. ही निवडणूक सहजासहजीने जिंकू नये असा त्यामागचा डाव आहे”, असे संजय शिरसाट यांनी म्हंटले आहे.

काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दंगल उसळली होती. तसेच ऑगस्टमध्येही एका व्हायरल व्हिडिओमुळे तणाव निर्माण झाला होता. एका धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या धर्मातील धर्मगुरुबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ एका गटाकडून गंगापूर, वैजापूर, खंडाळा येथे टायर जाळून जोरदार निदर्शने करण्यात आली. यामुळे तणाव ग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

Sharad Pawar On Maharashtra Finance Situation | ‘एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल’,शरद पवारांकडून चिंता व्यक्त, म्हणाले – ‘फडणवीसांवर विश्वास पण…’

You may have missed