Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Ajit Pawar-Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) मोठी इन्कमिंग सुरु असतानाच आता शिवसेना ठाकरे गटातही (Shivsena Thackeray Group) पक्ष प्रवेश वाढताना दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपची (BJP) साथ सोडून आज दोन बडे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोकणातील भाजप नेते राजन तेली (Rajan Teli), सांगोल्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे (Deepak Aba Salunkhe) आणि चिंचवड येथील मोरेश्वर भोंडवे (Moreshwar Bhondve) हे नेते आज मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत.

राजन तेली हे भाजपचे सावंतवाडी मतदारसंघातील (Sawantwadi Assembly) बडे नेते असून त्यांनी दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याविरोधात विधानसभा लढवण्यासाठी ठाकरे गटाचा मार्ग निवडला आहे. आज सायंकाळी पाच वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

दुसरीकडे सांगोल्यातून (Sangola Assembly) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे यांचा संध्याकाळी चार वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा केला होता.
मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दीपक आबा साळुंखे हे शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil)
यांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. चिंचवड (Chinchwad Assembly)
येथील अजित पवार गटाचे मोरेश्वर भोंडवे यांचा सहा वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed