Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटेना; जागावाटपावरून रस्सीखेच
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) जागावाटप अद्याप झालेले नाही. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. काही जागांवर दोन्ही पक्षांनी तर काही जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. (MVA Seat Sharing Formula)
विदर्भातील काही जागांवर चर्चा अडकली आहे. ज्या जागा काँग्रेस अनेक वर्ष जिंकत आली आहे, त्या जागा देखील आम्हाला दिल्या पाहिजेत असा आग्रह ठाकरे गटाचा आहे. वांद्र्यात झिशान सिद्दिकी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. ती जागा ठाकरे गटाला वरुण सरदेसाई यांच्यासाठी हवी आहे. कुलाबा, भायखळा या जागासाठीही त्यांचा आग्रह आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
संपूर्ण कोकण आम्ही ठाकरे गटासाठी (Shivsena Thackeray Group) दिला आहे. विदर्भात काँग्रेसची ताकद आहे. ज्या भागात ज्यांची ताकद आहे, त्या भागात त्यांनी उमेदवार उभे करावेत असे ठरलेले असतानाही, ठाकरे गटाकडून काही नेते विशिष्ट जागांसाठी आग्रह धरला जात आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. ती बैठक सकारात्मक झाली असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते.
शरद पवार (Sharad Pawar) आणि ठाकरे गटात जागावाटपांचे काय झाले
याविषयी माहिती समोर नसली तरी काही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही
जागांवर दोघांचाही आग्रह असल्याने हा तिढा वाढत चालला आहे.
दरम्यान आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत जागांचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?