Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत ऑल इज वेल! काँग्रेसकडून स्पष्टीकरण, दिल्लीत महत्वाची बैठक

Sharad Pawar-Uddhav Thackeray-Rahul Gandhi

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) फारकत घेत ठाकरेंची शिवसेना वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यावरूनच आता काँग्रेसने (Congress) प्रतिक्रिया दिली असून मविआ मध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे म्हणत सुरु असलेल्या चर्चेवर पडदा टाकला आहे.

महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये (Shivsena Thackeray Group) जागा वाटपावरुन मतभेद आहेत. विदर्भ, नागपूर, तसेच सांगोल्याच्या जागेवरुन ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसही आपल्या मागणीवर ठाम आहे. त्यामुळेच दोन्ही पक्षांमध्ये वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

यावरुनच आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान आदित्य ठाकरेही शरद पवार यांच्या भेटीला वाय.बी चव्हाण सेंटरवर पोहोचले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मात्र काँग्रेसने हा दावा फेटाळला आहे. आमच्यात काही जागांवर तिढा आहे मात्र कोणताही वाद नाही,
असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे.
तसेच जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या तिढा सोडवण्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे.
राज्यातील काँग्रेस नेते के.सी वेणूगोपाल यांची भेट घेणार असून या वादांच्या जागेवर चर्चा होणार आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed