Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचा विरोध डावलून नवाब मलिकांना राष्ट्रवादीची उमेदवारी?
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | भाजपकडून (BJP) नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या महायुतीतील (Mahayuti) प्रवेशाला जाहीर विरोध केलेला असताना अजित पवार यांनी मलिकांना मागील काही बैठकीस बोलावल्याने महायुतीत वादंग निर्माण झाला होता. ” नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे.
आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. हे मान्यच आहे परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो. असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हंटले होते.
मात्र नवाब मलिक पक्षाच्या बैठकीस उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेचे मुंबईत स्वागत करणार आहेत. या मतदारसंघातून पुन्हा विधानसभेची निवडणुक लढण्यास नवाब मलिक इच्छुक असल्याची माहिती आहे. (Ajit Pawar NCP)
२२ ऑगस्टला मुंबईतील अनुशक्ती नगर (Anushakti Nagar), मानखुर्द शिवाजीनगर (Mankhurd Shivaji Nagar) याठिकाणी अजित पवार यांची जनसन्मान यात्रा होणार आहे. याचे स्वागत नवाब मलिक आणि त्यांचे कार्यकर्ते करणार आहेत. अनुशक्ती नगर हा नवाब मलिक यांचा मतदारसंघ आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवाब मलिक यांनी तयारी सुरु केलेली आहे. मलिक यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टिकोनातून या जन सन्मान यात्रेकडे पाहिले जातेय. नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेण्यास भाजपचा विरोध आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला नवाब मलिक यांनी उपस्थिती लावली होती.
यावरून भाजपने आक्षेप घेतला होता. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांना थेट पत्र लिहिलं होतं.
यात देशद्रोहाचे आरोप असलेल्या नेत्याला महायुतीमध्ये घेण्यात येऊ नये असा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.
मात्र अजित पवार यांच्याकडून नवाब मलिक यांना दूर करण्यात आलेलं नाही.
विधान भवनामध्ये देखील नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले होते,
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला देखील हजेरी लावली होती.
त्यामुळे भाजपचा विरोध असून देखील अजित पवार गट नवाब मलिकांना जवळ करत असल्याचे दिसत आहे.
उद्या त्यांना विधानसभेचे तिकीट देखील दिले जाऊ शकते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून