Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुक : अजित पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; राजकीय हालचालींना वेग
कोल्हापूर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. अनेक ठिकाणी पक्ष नेतृत्वांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौरे पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत बैठकांचे सत्रही सुरु आहेत.
पुढील दोन ते तीन महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असाच मुकाबला असणार आहे.
दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. कागल (Kagal Assembly Constituency) येथे रविवारी पार पडलेल्या मेळाव्या वेळी येथील जनतेला आवाहन करताना अजित पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना इतक्या विक्रमी मतांनी निवडून द्या की, समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
दरम्यान कागलमधून भाजप नेते समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) इच्छुक असतानाचा अजित पवार यांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजीत घाटगे आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) घाटगेंना आपल्या पक्षात घेणार असल्याच्या चर्चांचा उधाण आले होते.
तर आता अजित पवारांनी मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता समरजीत घाटगे
हे शरद पवार गटात जाऊन मुश्रीफांना थेट आव्हान देणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
आगामी काळात होणारी ही विधानसभेची निवडणूक हसन मुश्रीफांची सातवी निवडणूक असणार आहे.
या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजयबाबा घाटगे (Sanjaybaba Ghatge) यांनी त्यांचा पराभव केला होता.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी