Maharashtra Assembly Election 2024 | अजित पवारांचं ठरलं! विधानसभेच्या जागांबाबत केलं महत्वाचं विधान; म्हणाले – “…तर आपल्यालाच बाहेर जावं लागेल”

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी जागावाटपाबाबत महत्वाचे विधान केले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. (Mahayuti Seat Sharing)
जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जवळपास ६० जागा मिळतील, असे विधान अजित पवार यांनी केले आहे. युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपण ६० एक जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले.” आमची जागा वाटपात तसेच इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या असलेले आमदार आहेतच तिथे आपल्याला काम करायचे आहे. त्या ५४ जागा आपल्याला मिळतील मात्र ६० जागांपर्यंत आपल्याला मतदारसंघांमध्ये काम करायचे आहे. काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत. हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, शामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार आपल्याबरोबर आहेत,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे आहे.
तुम्हाला आम्ही तशी यादी देऊ. तुम्ही अजितबात गाफील राहू नका. आपल्याला न मिळणाऱ्या जागेवर शक्ती खर्च करु नका.
संवाद साधताना आपलेपणाने बोला. शांतपणाने, डोक्यावर बर्फ ठेवून संवाद साधा.
उगाच बाहेर काढा रे त्याला, असं करु नका. बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच बाहेर जावं लागेल.
कृपा करून काम करा, दुर्लक्ष करु नका,” असे म्हणत अजित पवार
यांनी कार्यकर्त्यांनाही विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद