Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

sharad pawar uddhav thackeray

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले होते. मविआने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३० जागांवर विजय मिळवला होता. शरद पवार यांच्या पक्षाने एकूण १० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ८ जागांवर शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार विजयी झाले

लोकसभेत मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला ७ जागा लढवण्याच्या तयारीत असून उमेदवार देखील जवळपास निश्चित झाले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस (Maharashtra Congress), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे (Shivsena UBT) सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. मुंबईतील घाटकोपर पूर्व (Ghatkopar East Assembly Constituency), कुर्ला (Kurla Assembly Constituency), वर्सोवा (Versova Assembly Constituency), जोगेश्वरी (Jogeshwari Assembly Constituency), दहिसर (Dahisar Assembly Constituency), अणुशक्ती नगर (Anushakti Nagar Assembly Constituency), मलबार हिल (Malabar Hill Assembly Constituency) या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक आहे.

घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, कुर्ल्यातून माजी आमदार मिलिंद कांबळे, वर्सोव्यातून नरेंद्र वर्मा, जोगेश्वरीमधून अजितराव रावराणे, दहिसरमधून मनीष दुबे, अनुशक्ती नगरमधून सुहेल सुभेदार, मलबार हिल येथून क्लाईड क्रॅस्टो लढण्यास इच्छुक आहेत.

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात एकूण विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे. त्यामुळे, उर्वरीत जागा ठाकरेंच्या शिवसेना आणि काँग्रेसला सोडल्या जातील. त्यामुळे, नेमकं किती व कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव