Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेसाठी शरद पवार गटाचं ठरलं; निरीक्षकांना दिल्या सूचना; ‘इतक्या” जागांवर लढण्याची तयारी

Sharad Pawar

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला (Mahayuti) फटका बसल्यानं राज्यात महायुतीच्या वतीनं विविध घोषणांची खैरात सुरू आहे.

सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जात आहे. “लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होऊ नये, म्हणून या निवडणुका थोड्या लांबवण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असं राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

मात्र सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना पाहायला मिळणार आहे. दोन्हीकडे तीन-तीन पक्ष असल्याचे जागावाटपावरून संघर्ष निर्माण होतानाचे चित्र आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar NCP) ९० ते १०० जागांवर लढण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार गट ९० ते १०० जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून १०० च्या जवळपास जागांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.

पक्षाचा अहवाल लवकरात लवकर गोळा करा आणि बूथ कमिट्या तयार करा,
अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने नेमलेल्या निरीक्षकांची झूम मीटिंग झाली होती.
यामध्ये यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.
गणपती उत्सवांनंतर पक्षाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed