Maharashtra Assembly Election 2024 | प्रकाश आंबेडकरांचे पत्र शरद पवारांना अडचणीत आणणार? ; विधानसभा निवडणुकांवर होणार परिणाम

Sharad Pawar Prakash Ambedkar

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (OBC Reservation) मिळण्यासाठी मराठा समाज (Maratha Samaj) आग्रही आहे तर त्याला ओबीसी समाज (OBC Samaj) विरोध करताना दिसत आहे. दोन्ही समाजाकडून आंदोलने, उपोषणे सुरु आहेत (Maratha Reservation). त्यातच आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणासाठी २५ जुलै पासून आरक्षण बचाव यात्रा (Arakshan Bachao Yatra) काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, ” आम्ही २६ जुलै पासून ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात करणार आहोत. त्याचा कोल्हापूर ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास असेल. अनेक ओबीसी संघटनांनी विनंती केली की, ओबीसींचा लढा हातात घ्या. आताची परिस्थिती भयानक होत आहे. नामांतराची आठवण येईल असे सुरु आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना भीती आहे.

तर दुसरीकडे ‘मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गरीब मराठ्यांसाठी आंदोलन सुरु आहे. सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची आहे. ते गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत. सगेसोयरे हे भेसळ आहे. आताच्या मिळालेल्या नोंदीवरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे (Maratha Kunbi Caste Certificate) दिली आहेत ती रद्द करावीत असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Election 2024)

दरम्यान आता प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना या आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी पत्र लिहिले आहे. शरद पवार सहभागी होण्याची मी वाट पाहत आहे असेही ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना ओबीसी बचाव यात्रेचे निमंत्रण देत आंबेडकरांनी शरद पवारांना अडचणीत आणले आहे.
कारण जर शरद पवार या यात्रेत सहभागी झाले तर मराठा समाज नाराज होण्याची शक्यता आहे.
तर यामध्ये सहभागी नाही झाले तर ओबीसी समाज नाराज होण्याची शक्यता आहे.
या कठीण परिस्थितीत शरद पवार आंबेडकरांच्या पत्राबाबत काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही यात्रा २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली,सोलापूर,
उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड़, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम,
जालना अशी होत ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे समाप्त होईल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Puja Khedkar | UPSC ने गुन्हा दाखल करताच पूजा खेडकर नॉट रिचेबल; पुणे पोलिसांनी समन्स बजावूनही उपस्थित नाहीत

Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक

Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य

You may have missed