Maharashtra Assembly Election 2024 | ‘लोकांचाही कौल काँग्रेसच्या बाजूने’, महाविकास आघाडीत काँग्रेस जास्त जागा लढवणार?

Mahavikas Aghadi-Shivsena UBT

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत (Mahavikas Aghadi Seat Sharing Formula) चर्चा सुरु झालेल्या आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसने जास्तीच्या जागा लढाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आम्हाला हे सरकार घालवायचं आहे, असे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुतीवर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, जागावाटपाबाबत आमच्या तीन बैठका झाल्या आहेत. या महिन्यात बैठका संपतील. सप्टेंबर अखेरपर्यंत जागावाटपाचा तिढा कुठल्याही स्थितीत सुटावा यादृष्टीने आमचे काम सुरू झाले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने जास्त जागा लढाव्यात ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आलेल्या सर्व्हेतून ते दिसते. आघाडी धर्म असल्याने यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

त्याशिवाय जागांबाबत कार्यकर्त्यांचा दावा आहे. लोकांचाही कौल काँग्रेसच्या बाजूने आहे. आम्हाला महापापी सरकार गाडायचं आहे. जागावाटपाचा जो काही तिढा आहे तो आम्ही समन्वयाने सोडवू. या महाराष्ट्रात आपलं सरकार आलं पाहिजे. हे सरकार गेले पाहिजे. लोकांना चांगले सरकार दिले पाहिजे या भूमिकेतून आम्ही प्रयत्न करू, अशी भूमिकाही वडेट्टीवारांनी मांडली.

दरम्यान, महाराष्ट्रात जे वातावरण आहे, लोकांच्या मनात वेदना आहेत. संतापाची चीड आहे. या सर्वात महाविकास आघाडी विरोधक म्हणून महिलांचे शोषण होत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर आम्ही शांत बसायचं का? आम्ही डोळे बंद करून यांचे सर्व पाप सहन करायचे का? हे जेवढे राज्यातील उद्ध्वस्त करतील ते आम्ही बघत बसायचे का? सरकार म्हणून सामान्य माणसांवर कुठेही अन्याय होणार नाही.

महिलांचे शोषण होणार नाही. राज्यातील, देशातील महापुरुषांचा अपमान होणार नाही ही त्यांची जबाबदारी आहे.
या सरकारच्या नाकर्तेपणासाठी आम्ही आंदोलन करतोय. भाजपा स्वतःचं पाप लपवण्यासाठी आंदोलन करतायेत.
आम्ही यांचे पाप उघडं करण्यासाठी पुन्हा आंदोलन करतोय असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed