Maharashtra Assembly Election 2024 | ‘आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही मविआचे काम करणार नाही’, पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांचा इशारा; म्हणाले – ‘शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी…’

sharad pawar uddhav thackeray

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | पिंपरी (Pimpri Assembly), भोसरी (Bhosari Assembly), चिंचवड (Chinchwad Assembly) हे विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Sharad Pawar NCP) वाट्याला गेले आहेत. त्यामुळे शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान एकत्र येत त्यांनी तिन्ही विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना वाटाघाटीत काहीशी अपयशी ठरल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने सुलक्षणा शीलवंत (Sulakshana Shilwant -Dhar) यांना उमेदवारी दिली आहे, तर चिंचवड मतदारसंघात राहुल कलाटे (Rahul Kalate) व भोसरीमधून अजित गव्हाणे (Ajit Gavhane) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले म्हणाले, ” पिंपरी, चिंचवड व भोसरी येथील मविआचे तिन्ही उमेदवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही महाविकास आघाडीचे काम करणार नाही. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कोणीतरी षडयंत्र रचत आहे.

संपूर्ण राज्यात उद्धव ठाकरे यांची मोठी लोकप्रियता आहे. तसेच माझं स्पष्ट मत आहे की उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी किंवा ते भविष्यात मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिथे आमचे विजयी उमेदवार आहेत, जिथे आम्ही भक्कम आहोत, त्या जागा आम्हाला दिल्या जात नाहीत. “

तुमचा रोख शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे का? असे माध्यमांनी विचारल्यानंतर सचिन भोसले पुढे म्हणाले,
” हो, पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय होत आहे. ज्या जागा आम्ही जिंकू शकतो,
त्या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हिसकावल्या आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण