Maharashtra Assembly Election 2024 | पिंपरी चिंचवडमधील भाजपचा मोठा नेता ठाकरेंच्या गळाला; शहरात महायुतीला रोखण्यासाठी रणनीती
पिंपरी : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. दरम्यान पक्षांतराला वेग आल्याचे चित्र आहे. अजित पवारांचा (Ajit Pawar) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शरद पवारांनी (Sharad Pawar) सुरुंग लावल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) गळाला भाजपचा (BJP Leader) जुना नेता सापडला आहे. ( Maharashtra Assembly Election 2024)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील रवी लांडगे (Ravi Landge) यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. उद्या मंगळवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता रवी लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.(Maharashtra Assembly Election 2024)
रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे. त्यांचे चुलते आणि वडील हेही राजकारणात सक्रीय होते.
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत (Pimpri Chinchwad Municipal Corporation-PCMC) त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय.
पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे (Ankushrao Landge) यांचे पुतणे
आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे (Balasaheb Landge) यांचे पुत्र रवी लांडगे यांनी
अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे
यांनी भाजप रुजवली.
महापालिकेत भाजपचे दोन अंकी नगरसेवक निवडून आणले.
लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवी लांडगे पुढे आले.
२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक
म्हणून निवडून आले होते.
रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जातात.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य