Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत 163 जागांवर अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ चिन्ह; सुप्रिया सुळेंचा निशाणा; म्हणाल्या,” हा तर रडीचा डाव”
बारामती : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. (Pipani Symbol)
विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले आहे. भाजपचा हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. अजित पवारांनी साताऱ्याच्या सभेत याची कबुली दिली आहे. तुतारी आणि ट्रंपेट मुळेच साताऱ्याचा उमेदवार निवडून आला. यावरून दिसते की भाजप रडीचा डाव खेळत आहे. हे अजित पवारांच्या तोंडून आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” शरद पवार हे राजकारणातले भीष्म पिता आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी मान्य केले ना, त्यांच्यावर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही. त्यामुळे फडणवीस यांना तो अधिकार तर बनतोय . देवेंद्रजींना शरद पवार यांच्या शिवाय दुसरे काहीच दिसत नाही.”
शरद पवार यांच्यावर आरोप करून महागाईचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याकडे मूलभूत प्रश्न नाहीत, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस काही बोलत असतात असे म्हटले आहे.
गौतम अदानी त्या मिटींगला होते की नाही याबाबत मला काहीच माहिती नाही. ते स्वतः अजित पवारच एकदा हो म्हणतात तर एकदा नाही म्हणत आहेत. यामुळे आता याबाबत तुम्ही अजित पवार यांनाच विचारा, असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशीं बोलताना सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय
Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”
Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”