Maharashtra Assembly Election 2024 | संविधानावरील काँग्रेसच्या प्रचाराला RSS देणार उत्तर; विधानसभेसाठी बनवला हा खास प्लॅन; हरियाणाची रणनीती अवलंबणार

BJP RSS

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत आरक्षणाचा प्रश्न, संविधान बदलण्याची चर्चा या घटकांचा महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) प्रचारात भाजपला (BJP) मदत करणार आहे. हरियाणा विधानसभेला ज्याप्रमाणे आरएसएसने रणनीती आखली होती तशीच आता महाराष्ट्र विधानसभेला आखली जाणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हरियाणातील यशस्वी प्रयत्नांच्या आधारावर आरएसएस महाराष्ट्रात ५० हजार हून अधिक लहान बैठका आणि जनसंपर्क अभियान राबविणार आहे. या मोहिमेच्या यशावर महायुतीच्या समर्थनात जनमत वळवण्याची आणि महाविकास आघाडीच्या सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नांना रोखण्याची क्षमता अवलंबून आहे.

त्यानुसार आता राज्यात व्यापक जनसंपर्क मोहिमेची योजना आखली जात आहे. राज्यातील मतदारांना भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे आकर्षित करणे हे त्याचे उद्दिष्ट असणार आहे. काँग्रेसने सुरु केलेल्या ‘संविधान बचाओ’ अभियानाला उत्तर देण्यासाठी आरएसएस ‘संविधान सन्मान’ नावाचे अभियान हाती घेणार आहे.

संघाच्या मते, काँग्रेसने अनेक वेळा संविधानाचा अपमान केला आहे आणि समान नागरी संहिता विरोधात अडथळे निर्माण केले आहेत. आरएसएसचे वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले,” काँग्रेस संविधानाचे रक्षण करत असल्याचे दाखवत असली तरी, ती प्रत्यक्षात संविधानाच्या मूलतत्त्वांच्या विरोधात गेली आहे.

७० वर्षांच्या काळात काँग्रेसने संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर कधीच केला नाही.
” आरएसएसने डॉ. आंबेडकरांच्या शिकवणींचा महत्त्वाचा भाग आजही आपल्या प्रार्थनांमध्ये समाविष्ट ठेवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ” संघ राज्यभरात ३ लाखाहून अधिक लहान बैठका आयोजित करून
मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. याअंतर्गत संघ एक संयोजित यंत्रणेद्वारे काम करेल.
ज्यामुळे जनतेच्या मनामध्ये बदल घडवून आणता येईल.
यावेळी आरएसएस मतदार जागरूकतेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष निकालांवर प्रभाव
टाकण्याचा अधिक सक्रिय दृष्टिकोन अवलंबणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’,
अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक