Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘निवडणुकीनंतर अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे सांगणे कठीण’

Devendra Fadnavis Ajit Pawar

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचे सरकार असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) आम्हीच सत्ता स्थापन करणार असल्याचे दावे करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठा दावा केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘निवडणुकीनंतर अजित पवार भाजपाबरोबरच (BJP) असतील, हे आताच सांगणे कठीण आहे’, असे भाष्य मलिक यांनी केले आहे.

माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले, ” विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.

पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे. मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. पण यावर आपल्याला आता काही बोलायचे नाही “, असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले, ” राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि कुणीही कायमचा मित्र नाही. शत्रू मित्र होतात, मित्र शत्रू होतात. २०१९ च्या विधानसभा नंतर काय होणार याचा कोणी अंदाज बांधला होता का? तसेच २०२४ च्या निकालानंतरची परिस्थिती काय असेल सांगता येत नाही. परिस्थितीनुसार काहीही घडू शकते त्यात अजित पवार किंगमेकरच्या भूमिकेत असतील अशी खात्री आहे”, असे मलिक यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed