Maharashtra Assembly Election 2024 | भाजपनंतर आता अजित पवारांची डोकेदुखी वाढली; शिरूर मतदारसंघात बंडखोरी रोखण्याचं आव्हान

Ajit-Pawar

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेचे बिगुल वाजलं आहे. यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार असणार आहे. राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) या दोन पक्षात बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे वर्चस्व कोण राखणार हे या निवडणुकीवरून ठरणार आहे.

महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तीन-तीन पक्ष असल्याने एकाच मतदारसंघात एकाहून अधिक जण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी रोखण्याचे आव्हान त्या पक्षातील नेत्यांना असणार आहे.

अशातच आता शिरूर हवेली मतदारसंघामध्ये (Shirur Assembly Election 2024) महायुतीत बंडखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शांताराम कटके (Shantaram Katake) यांनी या शिरूर हवेली या मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे एकंदरीत शिरुर विधानसभा निवडणुक चर्चेची ठरत आहे. शिरूरसाठी महायुतीचा अधिकृत उमेदवार अजित पवार यांनी जाहीर करताच अनेकांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.

वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी समर्थकासह शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. समर्थक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यावेळी वाघोली ते शिरुर अशी भव्य रॅली काढून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिरूर हवेलीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार (Ashok Pawar NCP) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांनी माऊली कटके यांना उमेदवारी दिली आहे.

ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने याला विरोध केला होता. अखेर शांताराम कटके यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. याचा फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होऊ शकतो. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधील प्रदीप कंदही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे शिरूर हवेली मतदारसंघात रंगत निर्माण होणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)