Maharashtra Assembly Election 2024 | राज्याच्या जिल्ह्यांमधून राष्ट्रवादीच्या दोन यात्रा फिरणार; शरद पवार आणि अजित पवारांची जोरदार तयारी
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) या दोन्ही गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान अजित पवार गटाकडून जनसन्मान यात्रा (Jan Sanman Yatra) तर शरद पवार गटाकडून शिवसन्मान यात्रा (Shiv Sanman Yatra) निघणार आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये व प्रमुख शहरांमध्ये यात्रा फिरणार असून सभा, बैठका यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
शिवस्वराज यात्रेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) करणार आहेत. जुन्नरमधून ९ ऑगस्टला यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होईल. त्यानंतर १७ ऑगस्ट व पुढे याच पद्धतीने ऑगस्ट अखेरपर्यंत यात्रा सुरु असेल.
सातारा येथे यात्रेचा समारोप करण्याचे प्रस्तावित असून तिथे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेही (Supriya Sule) यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये यात्रेदरम्यान जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे स्वतः नेतृत्व करणार आहेत. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार व पक्षाचे अन्य ज्येष्ठ तसेच युवा पदाधिकारी यात्रेत सहभागी असणार आहेत. जनसन्मान असे या यात्रेचे नामकरण करण्यात आले आहे. या यात्रेतही मोठ्या शहरांमध्ये, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांनी राज्यात सुरू केलेल्या महिला सबलीकरण वगैरे योजनांची माहिती यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यात्रेतून करण्यात येणार आहे. नाशिक मधील दिंडोरी येथून ८ ऑगस्टला यात्रेची सुरुवात होत आहे. ही यात्राही वेगवेगळ्या टप्प्यात मार्गक्रमण करणार आहे. त्याचे वेळापत्रक तयार होत आहे, असे प्रदेश शाखेकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बरेच सावध झाले आहेत. तर मिळालेले यश टिकवून ठेवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. मतदारांबरोबर थेट संवाद याला दोन्ही गटांनी महत्व दिले आहे. प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यात सर्वदूर संपर्क साधला जावा, असा उद्देश यात्रेचा दिसतो आहे. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत तर अजित पवारांचा पक्ष महायुतीत सहभागी आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “यात्रेचे पुण्यातील नियोजन आम्ही केले आहे. जुन्नर नंतर लगेचच यात्रा पुण्यातील हडपसर, खडकवासला तसेच अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणार आहे.”
तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) म्हणाले, “स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सकाळी सारसबाग गणेश मंदिरात आरती करून पुणे शहरातील जनसन्मान यात्रेची सुरुवात होईल. आम्ही त्याचे नियोजन केले आहे. शहरातील सर्व मतदारसंघात संपर्क व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी
Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन
Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता,
इंजिनिअरसह तिघांना अटक
Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे;
पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल