Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वेगळी भूमिका; महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

सांगोला : Maharashtra Assembly Election 2024 | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गटात (Shivsena Thackeray Group) टोकाचे वाद सुरु असताना आता राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) एका जागेसाठी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला (Sangola Assembly Election 2024) या मतदारसंघासाठी शरद पवार यांचा पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे.
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांना पाठिंबा देणार आहे. रोहित पवार यांनीच तशी माहिती दिली आहे. त्यामुळे या सांगोल्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षातील नेते दीपक आबा साळुंखे (Deepak Aba Salunkhe)
यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
त्यामुळे ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
म्हणजेच सांगोल्यातून ठाकरे यांच्या पक्षाचे दीपक साळुंखे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची शक्यता आहे.
तशी तयारी देखील साळुंखे यांनी केली आहे.
मात्र शरद पवार यांचा पक्ष या जागेसाठी शेकापचे बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देणार आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?