Maharashtra Assembly Election 2024 | शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुकांचे हजारो अर्ज, उमेदवारी न मिळाल्यास पक्षाकडून इच्छुकांना अट; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळाले. १० पैकी ८ खासदार निवडून आले. सध्या शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. आगामी विधानसभेसाठी शरद पवार चांगलेच सक्रिय झाले आहेत.
https://www.instagram.com/p/DAYSdaHJxVY
राज्यात विविध ठिकाणी ते दौरे करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हजारो अर्ज आले आहेत. तसेच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेताना शरद पवार गटाने घातलेल्या अटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/p/DAYOpWOJeiJ
मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाच्या वाट्याला ८५ ते ९० जागा मिळू शकतात. या जागांवर इच्छूक असलेल्या उमेदवारांचे १३५० अर्ज पक्षाला प्राप्त झाले आहेत. दरम्यान, विधानसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार नाही, असे प्रतिज्ञापत्र या इच्छुकांकडून स्टँपपेपरवर लिहून घेण्यात आले आहे.
https://www.instagram.com/p/DAYKcPFpeVk
शरद पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या राखीव मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त दिसून येत आहे. त्यामध्ये देवळाली विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. तर अणुशक्तिनगरमधूनही ९ जण इच्छुक असल्याचं समोर आले आहे.
https://www.instagram.com/p/DAYJHl5pG3r
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागांवर विजय मिळाला होता. मात्र मागच्या वर्षी पक्षात फूट पडल्यानंतर पक्षातील बहुतांश नेते हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेले होते.
https://www.instagram.com/p/DAYH5WVJzI7
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’