Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरु आहेत. मात्र भाजपची (BJP) मोठी गोची झाल्याचे समोर येत आहे. सत्ता स्थापन करताना शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) भाजपने सोबत घेतले त्यानंतर बहुमत असतानाही आणखी एक मोठा मराठा चेहरा सोबत ठेवायचा म्हणून अजित पवारांनाही (Ajit Pawar NCP) सोबत घेतल्याने महायुतीत जागावाटपाचा तिढा (Mahayuti Seat Sharing) आता वाढलेला आहे. भाजपला जास्ती जास्त जागेवर निवडणूक लढवायची आहे. (MH Election 2024)
मात्र जागावाटपाच्या वेळी भाजपला एक नव्हे तर दोन पक्षांसोबत बोलणी करावी लागणार आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. या शिवाय महायुतीत काही छोटे पक्ष आहेत. आता भाजप स्वत:च्या जागा कमी न करता या दोन पक्षांसोबत कशी बोलणी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महायुतीच्या जागावाटपात भाजप जर १६४ च्या खाली आले तर त्यांच्या अडचणी वाढतील. ज्या भाजप नेत्यांना तिकीट मिळणार नाही त्यांच्या समोर महायुतीच्या उमेदवाराला स्विकारणे किंवा अन्य पक्षाकडून निवडणूक लढवणे असे दोन पर्याय असतील.
यावेळी भाजपवर शिंदे आणि अजित पवार यांना पुरेशा जागा देण्याचा दबाव असेल. या शिवाय काही छोटे पक्ष आहे ज्यांच्यासाठी जागा सोडावी लागेल, ज्यामध्ये रवी राणा (Ravi Rana), महादेव जानकर (Mahadev Jankar), आरएसपी (RSP) सारख्या पक्षांचा समावेश होतो.
२०१९ च्या निवडणुकीत २३ जागांवर भाजपचा ८ हजार पेक्षा कमी मतांनी पराभव झाला होता. या जागांचा विचार केला तर भाजपची १२८ जागांवर दमदार कामगिरी झाली होती. आता यापैकी किती जागा ते यावेळी स्वत:कडे राखतात हे पाहावे लागले. यावेळी भाजपने १४० जागांवर निवडणू्क लढवली तर २० मतदारसंघात भाजपचे नेते पक्ष सोडू शकतात.
कारण याठिकाणी संबंधित उमेदवार पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर होते.
२०१४ तुलना केली तर ही संख्या ४२ वर जाईल.
भाजपला स्वत:चे उमेदवार आणि नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्याचे आव्हान असेल. (Maharashtra Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी