Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना 120 जागा लढण्याच्या तयारीत; शिंदे गटाने स्पष्ट केल्याने भाजप-राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष; जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये धुसफूस
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारीला वेग आला आहे. दरम्यान महायुतीतील पक्ष किती जागा लढवणार याबाबत पक्ष नेतृत्वाच्या बैठकाही झालेल्या आहेत. जागावाटपाचा आकडा अजून स्पष्ट झाला नसला तरी कोण किती जागा लढेल याबाबतच्या शक्यता समोर येत आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये धुसफूस निर्माण होण्याची शक्यता आहे. (Mahayuti Seat Sharing Formula)
त्यातच शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यात भर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना राज्यात १२० जागा लढवेल असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे. ( Maharashtra Assembly Election 2024)
आमदार संजय गायकवाड म्हणाले, ‘ येत्या विधानसभा निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वामध्ये लढल्या जातील. शिवसेना १२० जागा लढवणार आहे. आमचं टार्गेट हे १०० जागा जिंकण्याचं आहे.’ संजय गायकवाड यांच्या या दाव्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
कारण, शिवसेनेला १२० जागा मिळाल्या तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला खूप कमी जागा येतील. त्यामुळे ते भाजपला खास करून अजित पवार गटाला कदापी मान्य नसेल. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. शिवेसेनेने एकट्याने १२० जागा लढल्यास इतर घटक पक्षांच्या वाट्याला खूप कमी जागा येतील.
भाजप १५० जागा लढण्याचा विचार करत आहे, शिवसेना १२० जागा लढण्याचं बोलत आहे. अशात अजित पवार गटाला काहीच जागा राहणार नाहीत. किंवा भाजपला आपल्या जागांमध्ये घट करावी लागेल. अशात राज्यात शिवसेना मोठा भाऊ ठरेल. या सर्व घडामोडी पाहता सध्यातरी शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी