Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना ठाकरे गट अन् राष्ट्रवादी शरद पवार गट सतर्क, आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश

sharad pawar uddhav thackeray

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. दरम्यान आज (दि.२२) शरद पवार (Sharad Pawar NCP) आणि शिवसेना (उबाठा) Shivsena UBT प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या उमेदवारांसह ऑनलाइन बैठक घेतली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे, या दोघांचेही पूर्वीचे अनुभव चांगले नाहीत.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अनेक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर, जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनीदेखील शरद पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीत बंड पुकारले आणि महायुतीत सामील झाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमुळे महाराष्ट्रात दोन नवीन पक्ष उदयास आल्याने राज्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत.

अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पुन्हा अशा प्रकरची फूट पडू द्यायची नसल्यामुळे ते आपल्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही. मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. याआधी मुख्यमंत्री चेहऱ्यावरुन विरोधकांच्या गोटात खडाजंगी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतमोजणीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या नेत्यांची आणि उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली असून, शनिवारी (दि.२३) निकालानंतर सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी विजयी उमेदवारांसाठी मुंबईत राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Punit Balan Studios – Raanti Movie | पुनीत बालन स्टुडिओज निर्मित अ‍ॅक्शनपॅक्ड ‘रानटी’ आज चित्रपटगृहात

Punit Balan Studios-Raanti Movie | चित्रपटगृहात ‘रानटी’चा धुमाकूळ ! सर्वच चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल  प्रतिसाद

You may have missed