Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना ठाकरे गटाची मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी समोर; 20-22 जागांसाठी आग्रह
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सज्ज झाली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत असतानाच शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) मुंबईतील संभाव्य उमेदवार ठरवले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. त्यात आदित्य ठाकरे पुन्हा एकदा वरळीतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत मुंबईच्या ३६ जागांसाठी आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. त्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळतील असे बोलले जात आहे.
ठाकरे गटाने २०-२२ जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यात जे विद्यमान आमदार ठाकरे गटासोबत आहेत त्यांना पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीत उतरवलं जाईल. त्याशिवाय नवोदित चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे.
काही जागांवर २-३ जणांच्या नावाची चर्चा आहे. मुंबईतील ६ लोकसभा जागांपैकी अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय पाटील यांच्या रुपाने ३ खासदार ठाकरे गटाचे निवडून आलेत. त्यामुळे मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे.
सध्या महाविकास आघाडीत मुंबईतील जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे समोर आलेली ही यादी संभाव्य असून त्यात येत्या काळात काही बदलही अपेक्षित आहेत.
मुंबई, ठाणे या भागात जास्तीत जास्त लढवण्यावर ठाकरे गटाचा भर आहे. कारण याठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या संघटनेची ताकद आहे. मोठ्या संख्येने मतदान ठाकरेंसोबत आहे त्यामुळे या भागात अधिक आमदार निवडून आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकाही तोंडावर आहेत. त्यामुळे मुंबई-ठाणे महापालिकेत सत्ता आणण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
उमेदवारांची संभाव्य यादी खालीलप्रमाणे,
आदित्य ठाकरे – वरळी
तेजस्विनी घोसाळकर – दहिसर
वरूण सरदेसाई – वांद्रे पूर्व
सुनील प्रभू – दिंडोशी
सुनील राऊत – विक्रोळी
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
संजय पोतनीस – कलिना
प्रविणा मोरजकर – कुर्ला
श्रद्धा जाधव – वडाळा
अमोल किर्तीकर – जोगेश्वरी
निरव बारोट – चारकोप
समीर देसाई – गोरेगाव
रमेश कोरगांवकर – भांडूप
ईश्वर तायडे – चांदिवली
सचिन अहिर किंवा विशाखा राऊत – दादर माहिम
प्रकाश फातर्पेकर – चेंबूर
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा