Maharashtra Assembly Election 2024 | मुख्यमंत्री शिंदेंचा बीडमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या नेत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde-Uddhav Thackeray

बीड : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठिकठिकाणी पक्षांतरे होत असल्याचे चित्र आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. दरम्यान बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena UBT) शिंदे गटाने (Shivsena Eknath Shinde) मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला फोडण्यात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांना यश आले आहे.

महिला आघाडी जिल्हा प्रमुख व राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण यांच्यासह युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रविराज बडे व गजानन कदम यांनी समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

मुंबईत मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकार सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे सरकार आहे. गेल्या दोन वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी घेतला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भरत गोगावले,
शिवसेना उपनेत्या कमला शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक आदी उपस्थित होते.

यावेळी अमोल जाधव, सचिन जाधव, संतोष ललवाणी, दिपकचंद्र शेनोरे, दिपक कदम,
शैलेश कासार, जगदीश वखरे, अक्षय घल्लाळ, ओम आगलावे, प्रवीण लांडगे, यश लांडगे,
सचिन उडान, अमन भालेकर, नाना शिंदे, गणेश उडान, मेघनाथ काळे, आदित्य जाधव, स्वयम् पवार,
अभी तीठे, जयदत्त किरकत, राजेंद्र सानवटे, रामेश्वर किरकट आदी तालुका ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed