Maharashtra Assembly Election 2024 | हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं शिवसेना शिंदे गटाच्या अंगलट, चौकशी होणार; शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

CM Eknath Shinde

नाशिक: Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. (Shivsena Shinde Group)

२९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. यंदाच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून नाराजीनाट्य पाहायला मिळाले. अनेक पक्षांतील नेत्यांकडून बंडखोरी करण्यात आली आहे. महायुतीमध्ये देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. महायुतीतील दुसऱ्या पक्षाला जागा देण्यात आली असताना त्याठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. वेळेमध्ये उमेदवारी अर्ज भरावा यासाठी शेवटपर्यंत सर्व इच्छुकांची धावपळ झाली. (Maharashtra Assembly Election 2024)

अशामध्ये शिंदे गटाने आपल्या पक्षाच्या नाशिकमधील दोन उमेदवारांसाठी शेवटच्या क्षणाला हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. याचप्रकरणी आता शिवसेना शिंदे गट चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणे शिंदे गटाच्या अंगलट आले आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून विचारणा होताच जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टरने एबी फॉर्म नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी एबी फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी होणार आहे. यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईच स्वरुप निश्चित होणार आहे.

२९ तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या अवघ्या काही वेळ अगोदर शिंदे सेनेकडून
एबी फॉर्म देण्यात आले होते. दिंडोरीच्या धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना हे एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक