Maharashtra Assembly Election 2024 | लंकेच्या विजयात आमचाही वाटा म्हणत पारनेरच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा; पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
पारनेर : Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे (Shivsena UBT) तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे (Dr Shrikant Pathare) व शिवसेनेतर्फे महाराष्ट्र अस्मिता मेळावा (Maharashtra Asmita Melava) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पारनेर मतदारसंघावर (Parner Assembly Constituency) दावा केला आहे.
मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “रात्रीच्या अंधारात ४० गद्दार पळून गेले, हा राज्याच्या अस्मितेला कलंक आहे. तो धुवून काढण्यासाठी राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे. मागील अडीच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. राज्याची अस्मिता वाचविण्यासाठी पक्ष फोड्या भाजपचा पराभव करणे गरजेचे होते, म्हणून आम्ही एकदिलाने खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडून दिले. यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे.
त्यावेळी पारनेरची जागा शिवसेनेला देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता पारनेरची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी मी श्रेष्ठींना साकडे घालणार आहे. पारनेरची जागा आपणच घेणार आहोत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी लोकसभा निवडणूक काळात दिलेला शब्द पाळावा, असे अंधारे म्हणाल्या.
तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले की, पारनेर ही शिवसैनिकांनी खाण आहे. शिवसैनिकांवर झालेला अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही. आम्ही लोकसभेला महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत केली. तालुक्यात शिवसेनेची ८० हजार मते आहेत. निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द आघाडीच्या नेत्यांनी पाळावा व पारनेर विधानसभेची जागा शिवसेनेला सोडावी, असे पठारे म्हणाले.
या मेळाव्यासाठी जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, डॉ. भास्कर शिरोळे, सुवर्णा वाळुंज, प्रियंका खिलारी,
रवी वाकळे, किसन सुपेकर, अनिल शेटे, गुलाबराव नवले, ऍड. कृष्णा जगदाळे, कोमल भंडारी,
डॉ. पद्मजा पठारे, राजू शेख, संतोष येवले, शरद झोडगे, सुनीता मुळे आदी उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?