Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून संघर्ष पेटला! शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरीचा इशारा

sharad pawar-uddhav thackeray-nana patole

पारनेर : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा जाहीर होऊ शकते. दरम्यान निवडणूक आयोगाकडून तशा हालचाली सुरु आहेत. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) सामना पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/DASjYGBJs3_

त्यामध्ये आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje), बच्चू कडू (Bachchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि इतरांनी मिळून तिसऱ्या आघाडीची (Maharashtra Third Front) घोषणा केली आहे. त्यामुळे मतदारसंघात तिहेरी निवडणूक पाहायला मिळू शकते. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु आहे.

https://www.instagram.com/p/DASgQ7AC-OH/?img_index=1

अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेला पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) महाविकास आघाडीमध्ये चांगलाच संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत असून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले (Sandesh Karle) यांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/DASejKNJE53

पारनेर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे आता खासदार निलेश लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आमदारकीला हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी (Uddhav Thackeray) सोडावा.

https://www.instagram.com/p/DAScxq0ptls

अन्यथा शिवसैनिक अन्याय सहन करणारे नसतात, वेळप्रसंगी बंडखोरी होईल,
असा थेट इशाराही संदेश कार्ले यांनी दिला आहे. या मतदारसंघात निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके इच्छुक आहेत.
त्यामुळे आता महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमक्या कुणाच्या वाटेला येणार?
हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

https://www.instagram.com/p/DASU34rCrpK/?img_index=1

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)

You may have missed