Maharashtra Assembly Election 2024 | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या कुटुंबीयांचीच नावे मतदार यादीतून ‘गायब’

Jyoti Kadam family members name missing from voter list

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज बुधवार (दि.२०) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. (Jyoti Kadam Family News)

दरम्यान, पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या आई-वडिलांची तसेच नातेवाईकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका उपजिल्हाधिकारी यांच्या कुटुंबियांनाच बसल्याने हा चर्चचा विषय ठरत आहे.

लोकसभेच्या वेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मात्र आता विधानसभेला ही नावे गायब झाल्याची माहिती आहे. त्यांनी औरंगाबाद या ठिकाणी लोकसभेला मतदान केले होते मात्र त्यांची विधानसभेच्या निवडणुकीवेळी नावे गायब असल्याचे समोर आले आहे. एकनाथ लाटे, स्वाती लाटे, नंदा लाटे अशी नातेवाईकांची नावे आहेत.

याबाबत बोलताना ज्योती कदम म्हणाल्या, ” मी माझे नाव कमी करण्याचा अर्ज प्रशासनाकडे केला होता. मात्र प्रशासनाने आई-वडिलांचीच नावे कमी केल्याचे समोर आले आहे.”

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed