Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला फटका?, अनेक मतदारसंघात भाजपाची डोकेदुखी वाढली

Mahavikas-Aghadi-Vs-Mahayuti

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात मागील काही काळात राजकीय घडी विस्कटल्याचे दिसत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) दोन पक्षात फूट पडली. त्यानंतर हे फुटलेले दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीला महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) लढत झाली त्यामध्ये महायुतीत भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group), राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) तर महाविकास आघाडीत काँग्रेस (Congress), शिवसेना ठाकरे गट (Shivsena UBT), राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar NCP) यांचा समावेश होता.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही राज्यातील सत्ता प्रयोगाचा महायुतीला पुन्हा फटका बसेल असे राजकीय जाणकार म्हणत आहेत. राज्यात जून २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेना सरकार आले आणि नंतरच्या वर्षी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला.

तीन पक्ष असे एकत्र आल्याने सत्ता तर मिळाली मात्र आता पुन्हा सत्ता मिळवताना नेमके तीन पक्षांचे असे एकत्र येणे अडचणीचे ठरू लागले आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल मतदारसंघातील (Kagal Assembly Constituency) भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे (Samarjeetsinh Ghatge) हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

कारण, तेथे महायुती ही मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना उमेदवारी देणार हे उघड आहे. त्यामुळे घाडगे यांना भाजप सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात (Indapur Assembly Constituency) अजित पवार गटाचे दत्ता भरणे (Dattatray Bharane) आमदार आहेत आणि तिथे भाजपचे गेल्यावेळी पराभूत झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तिथे दोघांपैकी एकालाच महायुती संधी देऊ शकणार असल्याने इंदापूरही कागलच्या वाटेवर जाईल, अशी चिन्हे आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

लातूर जिल्ह्यातील उदगीरचे (Udgir Assembly Constituency) आमदार व राज्याचे मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode)
यांना महायुतीची उमेदवारी मिळणार हे लक्षात आल्याने माजी आमदार व
भाजपचे नेते सुधाकर भालेराव (Sudhakar Bhalerao) आधीच शरद पवार गटात गेले आहेत.
रामटेक मतदारसंघातील अपक्ष व शिंदे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांना महायुतीने उमेदवारी दिल्यास तेथील
भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. अशा अनेक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”,
शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या

You may have missed