Maharashtra Assembly Election 2024 | बंडखोरीने महायुतीचे टेन्शन वाढलं; अनेक मतदारसंघात मतविभाजनाचा फटका बसणार
मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची मुदत होती. जागावाटपात अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने महायुतीतील (Mahayuti) काही नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेले नाही. ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येने लढत आहेत. यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
शायना एनसी यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काल शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) उमेदवारी जाहीर केली. पण याच मतदारसंघात आता भाजपच्या अतुल शाह यांनी बंडखोरी केल्याचे समोर आले आहे.
पश्चिम बोरवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अकोला पश्चिम विधानसभेतून भाजपने विजय अग्रवाल यांना तिकीट देण्याची घोषणा केली. अग्रवाल यांची उमेदवारी जाहीर होताच निवडणूक लढवू इच्छिणारे भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अशोक ओळंबे यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवली. त्यांनी भाजपाला राजीनामा देत प्रहारमधून आपला अर्ज दाखल केला आहे.
वांद्रे पूर्व जागेवरही आव्हान वाढले आहे. येथे अजित पवार गटाने झिशान सिद्दिकी यांना, तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कुणाल सरमळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली, पण भाजपाचे सम्राट महाडिक नाराज असल्याचे समोर आले आहे.
महाडिक यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज पाठीमागे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या विधानसभेत महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा