Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?

sharad pawar-devendra fadnavis

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. राज्यात दोन पक्ष फुटल्यानंतर विधानसभा निवडणूक होत आहे. दरम्यान जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुती (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) मध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे. त्यातच इच्छुक उमेदवार पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत.

कोल्हापूरचे भाजपचे नेते (Kolhapur BJP Leader) समरजित घाटगे (Samarjit Ghatge) हे शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते (Indapur), माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) देखील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) हा मोठा धक्का समजला जात आहे.

इंदापूरमध्ये अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गावभेट दौरे सुरु आहेत.

तर कोल्हापूर येथे अजित पवार गटाकडून मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची कागलमधून (Kagal Assembly) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र, समरजित घाटगे या जागेवरून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.
मात्र, ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाला गेली तर,
समरजित घाटगे हे मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनिती आखल्याचं बोललं जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला