Maharashtra Assembly Election 2024 | आणखी दोन बडे नेते अजित पवारांची साथ सोडणार; शरद पवारांच्या पक्षात घरवापसी होणार

पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान अजित पवारांची (Ajit Pawar Group) आणखी दोन बडे नेते साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shigane) हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar Group) प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Politics News)
विलास लांडे यांनी शरद पवारांची (NCP Sharad Pawar) भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की , ” मी पवारांसोबतच आहे. मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही. आजूबाजूच्या लोकांना ताकद देणार आहे. जास्तीत जास्त पवार साहेबांचे उमेदवार निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहे”, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” तसंच, ‘लपून छपून मी कधी भेटलो नाही. पवारांसोबत आम्ही कायम आहे, साहेब दैवत आहे, सर्वसामान्यांचा नेता आहेत. शिरूर, पिंपरी मधील उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी आलो आहे. आम्हाला अनेक जागा मिळतील. मी साहेबांसोबत आहे, लोकसभा निवडणुकीपासून सोबत आहे.
अजितदादांनी (NCP Ajit Pawar) लोकसभेला दिलेला उमेदवार पटलेला नव्हता. १८ – १९ तारखेला जागावाटप साहेब जाहीर करणार आहेत. भोसरी, खेड, मावळ, पुणे या ठिकाणी प्रचार करणार आहे. अजित दादाशी वैयक्तिक संबंध आहेत.”
तर येत्या दोन ते तीन दिवसात अजित पवारांची साथ आणखी एक आमदार सोडणार आहे. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवार गटाकडून ते विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा