Maharashtra Assembly Election 2024 | एकनाथ शिंदेंना चेकमेट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा डाव; आनंद दिघेंच्या वारसदाराला देणार तिकीट

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. राज्यात दोन पक्षात बंड झाल्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक रंजक असणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नवी रणनीती आखली आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघ (Thane Assembly Election 2024) हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्यात शिंदेंना अडकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चक्रव्यूह रचले आहे. शिंदे यांच्या विरोधात ठाण्यात ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांना तिकीट देण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
उद्धव ठाकरेंनी केदार दिघे यांना एबी फॉर्म दिला असल्याची माहिती आहे. ते पाचपाखडी मतदारसंघातून (Kopri-Pachpakhadi Assembly Constituency) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shivsena Thackeray Group) उभी फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना ठाण्याचे जिल्हाध्यक्ष पद दिले. दरम्यान आता शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी केदार दिघेंचे तिकीट निश्चित मानले जात आहे. (Shivsnea Shinde Group)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)
Pune Crime News | कुर्डवाडीहून पुण्यात येऊन रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या