Maharashtra Assembly Election 2024 | ‘महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा?’, खासदार विशाल पाटलांचा खुलासा, म्हणाले – “मी शिंदे गटासोबत किंवा महायुतीसोबत…”

MP Vishal Patil - Uddhav Thackeray

सांगली : Maharashtra Assembly Election 2024 | आटपाडी खानापूर मतदारसंघात (Khanapur Assembly Constituency) शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) संभाव्य उमेदवार सुहास बाबर (Suhas Babar) यांना काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार विशाल पाटील (MP Vishal Patil) यांनी पाठिंबा दिल्यावरून ठाकरे गटाचे (Shivsena UBT) जिल्हाप्रमुख संजय विभुते (Sanjay Vibhute) यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान लोकसभेनंतर आता पुन्हा एकदा आगामी विधानसभेला सांगलीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा वाद उभा राहणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

त्यावर आता खासदार विशाल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असून मी सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही तर माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिले असा खुलासा त्यांनी केला आहे.

मी सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नसून मी अपक्ष असल्याने सुहास बाबर यांना माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
त्यामुळे मी शिंदे गटासोबत किंवा महायुतीसोबत अशा चर्चा
या निरर्थक असून मी महाविकास आघाडीसोबतच ठामपणे असल्याचे पुन्हा एकदा विशाल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे विशाल पाटील यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून

Market Yard Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलीशी शारिरीक संबंध; त्याचा व्हिडिओ काढून 20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?

You may have missed